शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजय चौधरी ठरला 'महाराष्ट्र केसरी'

By admin | Updated: December 28, 2014 19:18 IST

कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे. रविवारी पुण्याच्या सचिन येलबरसोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजयने बाजी मारली.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. २८ - कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे. रविवारी पुण्याच्या सचिन येलबरसोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजयने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले आहे.  महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा विजय हा ४१ वा कुस्तीपटू ठरला आहे. 
महाराष्ट्र केसरी ही राज्यात मानाची सर्वोत्तम कुस्ती स्पर्धा म्हणून परिचित असून यंदा ही स्पर्धा अहमदनगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगली होती. लाल मातीत रंगणारी ही कुस्ती स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी पर्वणीच असते. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणा-या एकाही खेळाडूने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी हा किताब नवीन खेळाडू पटकावेल असा अंदाज होता. रविवारी जळगावच्या विजय चौधरी आणि पुण्याच्या सचिन येलबर यांच्यात अंतिम सामना पार पडला. यामध्ये विजयने सचिन येलबरला धूळ चारत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरीमध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील कुस्तीपटूंचा वरचष्मा होता. पण  जळगावमधील लहान गावातून आलेल्या विजयच्या या विजयामुळे महाराष्ट्रातील कुस्तीचे अच्छे दिन आल्याची भावना क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे.