VIDEO.. अन् युवराज झाला भावूक

By Admin | Updated: January 19, 2017 21:27 IST2017-01-19T20:21:18+5:302017-01-19T21:27:55+5:30

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कटक वनडेमध्ये धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करत 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले.

VIDEO .. and Yuvraj became emotional | VIDEO.. अन् युवराज झाला भावूक

VIDEO.. अन् युवराज झाला भावूक

ऑनलाइन लोकमत

कटक, दि. 19 - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कटक वनडेमध्ये धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करत 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. युवराजने 98 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि 15 चौकारासह झंझावाती शतक पूर्ण केले. युवराज सिंगने आजच्या सामन्यात 127 चेंडूचा सामना करताना तीन षटकार आणि 21 चौकारांसह 150 धावांची खेळी केली. यावेळी त्याने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.  
 
सहा वर्षानंतर दणक्यात पुनरागमन करत साकारलेल्या या धडाकेबाज खेळीनंतर युवराज भावूक झाल्याचे दिसून आले. शतकानंतर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आल्याचे दिसते. बीसीसीआयने याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. 
 

Web Title: VIDEO .. and Yuvraj became emotional