शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चक्क सुट्टीच्या दिवशीही ‘डीएसओ’ लागले कामाला

By admin | Updated: October 24, 2016 04:57 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (डीएसओ) आयोजित विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रद्द झाल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध करताच डीएसओ खडबडून जागे झाले

मुंबई : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (डीएसओ) आयोजित विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रद्द झाल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध करताच डीएसओ खडबडून जागे झाले. गुरुवारी सामना तांत्रिक कारणामुळे पुढे ढकल्याचे खालसा आणि एन.एल संघांना तोंडी सांगण्यात आले होते. मात्र अधिकृत पत्र देण्यात आले नव्हते. लोकमतने रविवारच्या अंकात याबद्दल बातमी प्रसिद्ध करताच काही तासांतच डीएसओने खालसा महाविद्यालयाला अधिकृत पत्राद्वारे व्हॉलीबॉल अंतिम सामना पुढे ढकल्याचे सांगितले. व्हॉलीबॉल अंतिम सामन्याच्या वादावर पडदा टाकण्यासाठी डीएसओने रविवारी सुट्टीच्या दिवशीही वेगाने सुत्र हलवली. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास खालसा महाविद्यालयाचे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विभागप्रमुख हरदिपसिंग सैनी यांना व्हॉट्स अ‍ॅपमार्फत डीएसओने अधिकृत पत्र पाठविले. एन.एल.महाविद्यालयाच्या निलेश ठक्कर यांना डीएसओच्या अधिकृत पत्राबाबत विचारले असता गुरुवारी सामना पुढे ढकलल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आम्ही डीएसओकडून हा निर्णय लिहून देण्याची मागणी केली. डीएसओ अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करत आम्हाला सामना तांत्रिक कारणामुळे पुढे ढकल्याचे लिहून दिले. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने सोमवारी पत्राबाबत माहिती मिळेल, असे ते म्हणाले. डीएसओने दिलेल्या पत्रात खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या बाबत खालसा महाविद्यालयाला विचारले असता, कोणत्याही स्वरुपाची बाचाबाची झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)