यूएस. ओपन: व्हीनसला नमवून सेरेना सेमी-फायनलमध्ये

By Admin | Updated: September 9, 2015 08:58 IST2015-09-09T08:53:41+5:302015-09-09T08:58:36+5:30

अव्वल मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनसचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमी-फायनलमध्ये धडक मारली.

US Open: Serena's semi-final defeat to Venus | यूएस. ओपन: व्हीनसला नमवून सेरेना सेमी-फायनलमध्ये

यूएस. ओपन: व्हीनसला नमवून सेरेना सेमी-फायनलमध्ये

ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. ९ - अव्वल मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनसचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमी-फायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेनाने व्हिनसचा ६-२, १-६,६-३ असा पराभव करत सेमी फायनल गाठली. आता सेमी फायनलमध्ये तिची गाठ इटलीच्या रॉबर्टा विन्सी हिच्याशी पडणार आहे.

सेरेनाने ही स्पर्धा जिंकल्यास या वर्षीच्या सर्व ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम ती नोंदवेल.

Web Title: US Open: Serena's semi-final defeat to Venus