शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी जोड

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

ॲरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एकाच षटकात तंबूचा मार्ग दाखविला.

ॲरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एकाच षटकात तंबूचा मार्ग दाखविला.
कर्णधार म्हणून पदार्पणाच्या लढतीत शतक साकारणारा स्मिथ दुसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला. यापूर्वी मायकल हसीने असा पराक्रम केला होता. कसोटी व वन-डेमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच लढतीत शतकी खेळी करणारा स्मिथ जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला. स्मिथने ग्लेन मॅक्सवेलसोबत (३७) चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची, जेम्स फॉकनरसोबत (३५) पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची तर ब्रॅड हॅडिनसोबत (४२) सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अखेरच्या क्षणी हॅडिन व मोएजेस हन्रिक्स (४) बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती, पण दुसऱ्या टोकाला स्मिथ उभा असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित होता. स्मिथने ॲन्डरसनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत वैयक्तिक शतकाकडे वाटचाल केली. त्यानंतर ख्रिस व्होक्सच्या षटकात १ धाव घेत वन-डे क्रिकेट कारकीर्दीतील तिसरे शतक झळकाविले. इंग्लंडतर्फे मोईन अली, व्होक्स व फिन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
त्याआधी, कारकीर्दीतील चौथे वन-डे शतक झळकाविणाऱ्या बेलच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने दमदार मजल मारली. भारताविरुद्ध नाबाद ८८ धावांची खेळी करणाऱ्या बेलने आजच्या खेळीत १५ चौकार १ षटकार ठोकला. (वृत्तसंस्था)