आयसीसीच्या टॉप 10 यादीत अक्षर पटेल

By Admin | Updated: October 31, 2016 18:19 IST2016-10-31T18:19:49+5:302016-10-31T18:19:49+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय गोलंदाजीच्या मानांकनात भारतीय गोलंदाज अक्षर पटेल याने टॉप 10 च्या यादीत स्थान मिळविले आहे.

In the top 10 list, | आयसीसीच्या टॉप 10 यादीत अक्षर पटेल

आयसीसीच्या टॉप 10 यादीत अक्षर पटेल

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.31 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय गोलंदाजीच्या मानांकनात भारतीय गोलंदाज अक्षर पटेल याने टॉप 10 च्या यादीत स्थान मिळविले आहे. तर, गोलंदाज अमित मिश्राने टॉप 20 मध्ये स्थान मिळविले आहे.
दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत गोलंदाज अक्षर पटेलने चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा फायदा अक्षरला झाल्याने तो टॉप 10 च्या यादीत नवव्या स्थानावर आला. तर अमित मिश्राने या मालिकेत  एकूण 15 विकेट्स घेतल्याने त्याला मालिकावीरचा किताब मिळालाच. पण आताच्या आयसीसीच्या यादीत तो 25 व्या स्थानावरुन थेट 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. 
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एकदिवसीय गोलंदाजीच्या मानांकनात अग्रस्थान कायम राखले असून विंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण दुस-या व दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर तिस-या स्थानावर आहे.

Web Title: In the top 10 list,