शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

...‘ती’ने खिळवून ठेवले

By admin | Updated: August 21, 2016 01:12 IST

ती आली... तिने पाहिले... ती खेळली... अन् अब्जोवधींच्या क्रिकेटवेड्या जनतेला खिळवून ठेवले! अशा काहीशा अंदाजात रिओ पदकवीर पी. व्ही. सिंधूच्या विजयाचे वर्णन करता येईल.

- महेश चेमटे, मुंबई

ती आली... तिने पाहिले... ती खेळली... अन् अब्जोवधींच्या क्रिकेटवेड्या जनतेला खिळवून ठेवले! अशा काहीशा अंदाजात रिओ पदकवीर पी. व्ही. सिंधूच्या विजयाचे वर्णन करता येईल. सिंधूच्या अंतिम सामन्यात १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक सेटमध्ये ३१ मिनिटांच्या कालावधीत सुमारे ९७० हून जास्त टिष्ट्वट झाल्याने अवघी सोशल मीडिया ही सिंधूमय झाली होती.शुक्रवारचा दिवस गाजवला तो सिंधूनेच. नेटिजन्स मोठ्या आतुरतेने सिंधूच्या सामन्याची वाट पाहत असल्याचे त्यांच्याच ‘अपडेट’मुळे कळत होते. फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपवर टोमण्यांनी, शुभेच्छांच्या नोटिफिकेशनमध्ये सातत्याने वाढ होत होती. याही पुढे जात नेटिजन्स प्रवासातील आपल्या मित्रांना अपडेट देण्यासाठी ग्रुपमध्ये एका-एका गुणाची माहितीदेखील देत होते. टिष्ट्वटरसारख्या ठिकाणी तर मंत्री महोदयांपासून ते राजकीय पक्षाचे टिष्ट्वटर अकाउंट सांभाळणाऱ्यांमध्ये टिष्ट्वट करण्याची चक्क स्पर्धाच सुरू होती. टिष्ट्वटरवर टिष्ट्वट करणाऱ्यांची संख्या तशीही लक्षवेधीच असते. मात्र रिओ बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात सिंधूने खऱ्या अर्थाने कमाल केली. १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक सेट तब्बल ३१ मिनिटे रंगला. या ३१ मिनिटांत सुमारे ९७०हून जास्त टिष्ट्वट सिंधूच्या सामन्याचे होते. विशेष म्हणजे यात गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांचाच सक्रिय सहभाग होता. सामन्याच्या निकालानंतर टिष्ट्वटचा वेग मंदावला मात्र थांबला नाही. व्हॉट्स अ‍ॅपवर तर नेटिजन्सने आपल्या गु्रपचे ‘कम आॅन सिंधू’, ‘गर्व से कहो हम सिंधू है’असे नामकरण केले. ‘सिंधूफिव्हर’ दुसऱ्या दिवशीही कायम होता. चंदेरी सिंधूवर बक्षिसांची खैरात करणाऱ्या संदेशांनी टिष्ट्वटर गाजवले; शिवाय ‘करते रहे गुनाह हम, केवल बेटे के शौक में... कितने मेडल मार दिए, जीते जी ही कोख में...’ अशी शायरीही नेटिजन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. अन् आर्चीला नाही म्हणा..!रिओ पदकविजेत्या साक्षी-सिंधूच्या आधी सोशल मीडियावर नेटिजन्स ‘सैराट’ झाले होते. मात्र या विजयानंतर नेटिजन्सनी आपली भूमिका बदलण्यास सुरुवात केली. ‘पळून जाऊन आई-बापाला मान खाली घालायला लावणाऱ्या आर्चीपेक्षा जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या साक्षी-सिंधू-दीपा यांची हवा करा... अन् आर्चीला नाही म्हणा..!’ असे फोटोसह संदेश व्हायरल होताना दिसले.