शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे अवघड - महेश भूपती

By admin | Updated: September 30, 2016 19:27 IST

लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. जागतिक स्तरावर टेनिस खुप मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

लंडनच्या तुलनेत रिओत भारतीयांची निराशामहेश चेमटे / मुंबई : लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. जागतिक स्तरावर टेनिस खुप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. परिणामी आॅलिम्पिक टेनिस स्पर्धेत पदक मिळवणे अवघड आहे, असे स्पष्ट मत दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने मांडले. सानिया, प्रार्थना यांनी रिओत चांगली कामगिरी केली असून आॅलिम्पिक पदक मिळवण्यासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता असल्याचेही मत दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने व्यक्त केले.मुंबईत आयोजित खासगी कार्यक्रमात महेश भूपतीने ‘लोकमत’ शी संवाद साधला. आॅलिम्पिकमध्ये टेनिस जलतरण, जिम्नॅस्टीक या खेळांच्या तूलनेत लहान खेळ आहे.

शिवाय टेनिस हा जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ असल्याने टेनिसमध्ये पदक मिळवणे अवघड आहे. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे शक्य असल्याचे भूपती म्हणाला.देशात आॅलिम्पिक आल्यावरच खेळाचे महत्त्व समजते मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी देशात क्रीडा संस्कृती अस्तित्वात आली नसल्याची खंत यावेळी भूपतीने व्यक्त केली. तो म्हणाला, क्रीडा संस्कृती नसल्यामुळे आॅलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत देखील आपल्याला बहुतांशी खेळात पराभव स्वीकारावा लागत आहे.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाने २०२४ आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. याबाबत बोलताना भुपती म्हणाला, केंद्र सरकार खेळासाठी खूप चांगले धोरण राबवत असून ते कौतूकास्पद आहे. देशात खेळ वाढवण्यासाठी आक्रमक ‘गेमप्लॅन’ तयार करण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात प्रभावीपणे अमंलात आणणे गरजेचे आहे. टेनिस खेळात दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंनी अकादमीची स्थापना करुन नवोदितांना टेनिसचे धडे देणे गरजेचे आहे.