क्लार्कच्या टॉप पाच खेळाडूंत तेंडुलकर

By Admin | Updated: June 4, 2015 01:17 IST2015-06-04T01:17:52+5:302015-06-04T01:17:52+5:30

आॅस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला आपल्या समकालीन टॉप पाच खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे.

Tendulkar's top five players include: | क्लार्कच्या टॉप पाच खेळाडूंत तेंडुलकर

क्लार्कच्या टॉप पाच खेळाडूंत तेंडुलकर

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला आपल्या समकालीन टॉप पाच खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे.
मायक्रो ब्लानिंग साइट ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी चर्चा करताना क्लार्कने या बाबीचा खुलासा केला. त्यात त्याच्याबरोबर अथवा त्याच्याविरुद्ध खेळणाऱ्या आवडत्या पाच खेळाडूत सचिन तेंडुलकर असल्याचे त्याने सांगितले. महान आॅस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू ब्रायन लारा यांचा समावेश आहे. क्लार्कला सर्वांत वेगवान गोलंदाज कोणाला खेळवशील असे विचारले असता त्याने पाकिस्तानच्या शोएब अख्तर याचे नाव घेतले. तथापि, त्याने अ‍ॅण्ड्र्यू फ्लिन्टॉफ सर्वात चांगला गोलंदाज असल्याचे स्पष्ट केले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Tendulkar's top five players include: