शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे लक्ष्य बरोबरीचे

By admin | Updated: October 11, 2014 04:31 IST

भारत आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावर दिवस-रात्र सामना रंगणार आहे.

नवी दिल्ली : पहिल्या वन-डे सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध उद्या, शनिवारी खेळल्या जाणा-या दुस-या लढतीत चमकदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पहिल्या सामन्यातील झालेल्या चुका सुधारण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. भारत आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावर दिवस-रात्र सामना रंगणार आहे. विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाला कचखाऊ फलंदाजीमुळे पहिल्या सामन्यात १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विंडीज प्लेअर्स असोसिएशन आणि विंडीज बोर्ड यांच्यादरम्यान वेतनाच्या मुद्द्यावरील वादामुळे विंडीज संघ मालिकेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना पहिला सामना खेळण्यात आला. कॅरेबियन खेळाडूंनी हा वाद विसरून चमकदार कामगिरी केली. विंडीज संघाने स्टार खेळाडू ख्रिस गेल व सुनील नरेन यांची उणीव भासू दिली नाही. गेल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर आॅफ स्पिनर नरेनचा संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे संघात समावेश करण्यात आलेला नाही. फिरोजशाह कोटलावर विजय मिळवित मालिकेत बरोबरी साधण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. पुढील होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाचे संतुलन साधण्यास प्रयत्नशील आहे. कोचीमध्ये भारतीय संघ १९७ धावांत गारद झाला असला तरी संघाचा फलंदाजी क्रम जवळजवळ निश्चित आहे. विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या तंत्राबाबत उघडउघड चर्चा केली असून, विराटने सूर गवसण्यासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा सल्ला दिला आहे. संघात केवळ अंबाती रायडूचा अपवाद वगळता उर्वरित सर्व खेळाडूंचे स्थान पक्के आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे रायडूला संधी मिळाली आहे. रायडूला अद्याप छाप सोडता आलेली नाही. रोहित तंदुरस्त झाल्यानंतर तो निवडीसाठी उपलब्ध राहणार असून तोपर्यंत मिळालेल्या संधीचे सोने करण्यास रायडू प्रयत्नशील आहे. भारतीय संघ सलामी जोडीबाबत चिंतेत आहे. पहिल्या सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या शिखर धवनमध्ये फटक्याची निवड करताना साशंकता असते. मुरली विजय ड्रेसिंग रूममध्ये असून उन्मुक्त चंद संधीची प्रतीक्षा करीत आहे. संघव्यवस्थापनाला धवनकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. गोलंदाजी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला ३२१ धावा बहाल केल्या. कोचीमध्ये फिरकीपटूंनी २२ षटकांमध्ये १४२ धावा दिल्या. यजमान संघाला मायदेशात फिरकीपटूंकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. धोनीने गोलंदाजांची पाठराखण केली असली तरी रवींद्र जडेजा व अमित मिश्रा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, हे विसरता येणार नाही. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळते का ? याबाबत उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)