शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित मायकल प्लातिनी अडचणीत येण्याची शक्यता

By admin | Updated: December 31, 2015 03:23 IST

युरोपियन फुटबॉल महासंघाचे (युईएफए) निलंबित अध्यक्ष मायकल प्लातिनी यांना खेळाच्या सर्वच कार्यक्रमांतून निलंबित करण्यात आले असले, तरी ते दुबईमध्ये झालेल्या पुरस्कार

मियामी : युरोपियन फुटबॉल महासंघाचे (युईएफए) निलंबित अध्यक्ष मायकल प्लातिनी यांना खेळाच्या सर्वच कार्यक्रमांतून निलंबित करण्यात आले असले, तरी ते दुबईमध्ये झालेल्या पुरस्कार समारंभात आणि संमेलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.प्लातिनी यांच्यावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) आचारसंहिता समितीने २१ डिसेंबर रोजी आठ वर्षांची बंदी घातली. त्यांना फुटबॉलच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त फिफाचे अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांनाही आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. पण, त्यानंतर सहा दिवसांनी २७ डिसेंबर रोजी प्लातिनी दुबईमध्ये आयोजित ‘ग्लोब सॉकर अ‍ॅवॉर्ड’ कार्यक्रमात सहभागी झाले. या पुरस्कार समारंभाचे आयोजन दुबई क्रीडा परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी आणि इटलीचा आंद्रिया पिरलो सहभागी झाले होते.फ्रान्सच्या प्लातिनी यांनी या पुरस्कार समारंभात सहभागी होताना छायाचित्र काढून घेतले आणि कार्यक्रमात इटलीच्या मीडियाला त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती. फिफाच्या आचारसंहिता समितीने प्लातिनीबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, फिफाच्या आचारसंहिता समितीची इन्व्हेस्टिगेटिव्ह चेंबर नियमाचे उल्लंघन झाले का, याची चौकशी करणार आहे.