आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

By Admin | Updated: October 26, 2016 00:52 IST2016-10-26T00:52:37+5:302016-10-26T00:52:37+5:30

सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक धक्का बसला आहे.

Suspended IPL Media Rights Tender Process | आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

नवी दिल्ली : सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक धक्का बसला आहे. बीसीसीआयला इंडियन प्रिमीयर लीगची (आयपीएल) मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागली.
आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया मंगळवारी होणार होती; पण बीसीसीआयने सोमवारी रात्री उशिरा ती स्थगित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निविदा उघडण्याची पुढील तारीख कोणती असेल, याबाबत मात्र बोर्डाने स्पष्ट केले नाही.बीसीसीआयने स्पष्ट केले, की ‘सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार लोढा समितीला आयपीएल निविदा प्रकियेचे संरक्षक म्हणून नियुक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Suspended IPL Media Rights Tender Process