शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फिफा महासचिव वाल्के निलंबित

By admin | Updated: September 19, 2015 03:56 IST

तिकीट घोटाळ्यात सामील असल्यावरून फिफा महासचिव जेरोम वाल्के यांना नाट्यमयरीत्या निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध तपास सुरू झाल्याने आधीच वादात

झुरिच : तिकीट घोटाळ्यात सामील असल्यावरून फिफा महासचिव जेरोम वाल्के यांना नाट्यमयरीत्या निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध तपास सुरू झाल्याने आधीच वादात अडकलेल्या फिफाच्या अडचणींमध्ये वाढ झाली.निवृत्त फिफा अध्यक्ष सॅप ब्लाटर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्के यांना ताबडतोब प्रभावाने जबाबदारीमुक्त करण्यात आले. भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासाला वेग यावा, यासाठी अटकेत असलेल्या फिफा उपाध्यक्षांना अमेरिकेच्या स्वाधीन करण्यास मात्र स्वित्झर्लंडने नकार दिला. फिफाने एका निवेदनात स्पष्ट केले की, वाल्के यांना ताबडतोब प्रभावाने सर्व जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. ते दीर्घ रजेवर गेले आहेत. फिफाला त्यांच्याविरुद्धच्या आरोपांची माहितीमिळताच फिफाच्या नैतिक समितीने औपचारिक तपास सुरू केला.विश्वचषकाच्या तिकीट विक्रीतील घोटाळ्यात सामील असल्याचा वाल्के यांच्यावर आरोप आहे. तिकिटांच्या कमाईचा मोठा वाटा त्यांच्या खात्यात वळता करण्यात आल्याची चर्चा आहे. २०१४ च्या विश्वचषक फुटबॉलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या एका कंपनीतील अमेरिकेचे सल्लागार बेली एलिन यांनी घोटाळ्याची चर्चा होताच हा करार नंतर रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)