शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

मयप्पनवर कठोर कारवाई व्हावी

By admin | Updated: November 20, 2014 00:01 IST

भारताचा माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी आज, बुधवारी ‘आयसीसी’चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावर टीका केली

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी आज, बुधवारी ‘आयसीसी’चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावर टीका केली. तसेच, ‘आयपीएल’प्रकरणी श्रीनिवासन यांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘मयप्पनवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हायला हवी. श्रीनिवासन यांना जर काही खेळाडू फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची माहिती होती, तर त्यांनी याविरुद्ध कोणतीही कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे.श्रीनिवासन यांना फिक्सिंगबाबत सर्व काही माहीत होते. मात्र, त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे मुदगल समितीमध्ये म्हटले असल्याचा रिपोर्ट आहे. असे असेल तर त्यांना माहीत असूनही संबंधित खेळाडूंवर कारवाई का केली नाही, याबाबतचे स्पष्टीकरण द्यायलाच हवे, असे गावसकर या वेळी म्हणाले.गावसकर म्हणाले, बेटिंगमध्ये बहुतांशवेळा काळ्या पैशाचाच वापर होतो. मात्र, एकदा बेटिंग अधिकृत केले तर यातून सरकारचा महसूलही वाढेल. जर कोणाला बेटिंग करायचे असेल, तर त्याने ते कायदेशीररीत्या करावे. भारताच्या आगामी आॅस्ट्रेलिया क्रिकेट दौऱ्याबाबत ते म्हणाले, भारतासाठी हा दौरा कठीण असणार आहे. भारतीय खेळाडूंनी संयम दाखवायला हवा. आॅस्ट्रेलियात खेळताना खेळाडूंच्या भात्यात नवीन शस्त्रे असायला हवीत. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्या फलंदाजीला पोषक असतात. मात्र, यासाठी खेळाडूंकडे संयम हवा.गावसकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून आॅस्ट्रेलियामध्ये गेले होते. मेलबोर्न क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉटही त्यांच्या समवेत होते.गावसकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेला विनोदी किस्साही सांगितला. ते म्हणाले, फोटोसेशनवेळी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी विश्वचषक हाती घेतला होता, तर आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ॅबॉट यांनी गावसकर-बॉर्डर चषक हाती घेतला होता. या वेळी मोदींना म्हणालो की, तुम्ही योग्य चषक हाती घेतला आहे. आपण गावसकर-बॉर्डर चषक जिंकला आहे. मात्र, पुढील वर्षी विश्वचषकच आपल्याला हवा आहे. (वृत्तसंस्था)