शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत २0 वर्षांनंतर राज्यस्तरीय स्पर्धा

By admin | Updated: October 22, 2015 00:49 IST

दिल्ली येथे जवळपास ७० हजार खेळाडू येथे २३ ते ३0 आॅक्टोबरदरम्यान विविध स्थळी होणाऱ्या राज्यस्तरीय दिल्ली आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन तालकटोरा

नवी दिल्ली : दिल्ली येथे जवळपास ७० हजार खेळाडू येथे २३ ते ३0 आॅक्टोबरदरम्यान विविध स्थळी होणाऱ्या राज्यस्तरीय दिल्ली आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन तालकटोरा स्टेडियममध्ये केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद यांच्या हस्ते होणार आहे.या स्पर्धेचे आयोजन तब्बल २0 वर्षांनंतर होत आहे; परंतु दिल्ली आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कुलदीप वत्स यांनी आता ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.वत्स यांनी म्हटले, ‘‘याआधी १९९५ मध्ये दिल्ली आॅलिम्पिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आता २0 वर्षांनंतर आम्ही मोठ्या स्तरावर आयोजन करीत आहोत; परंतु आता ही स्पर्धा प्रत्येक वर्षी घेण्यात येईल असे आश्वासन देतो.’’आम्हाला दिल्ली सरकारचा पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना एकूण ९0 लाख ते एक कोटी रुपये पुरस्कार राशी प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे समारोपास मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही वत्स म्हणाले.दिल्लीच्या या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, कुस्ती, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, तिरंदाजीसह एकूण २८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन तालकटोरा स्टेडियम, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, त्यागराज स्टेडियम, राजीव गांधी स्टेडियम, छत्रसाल स्टेडियम, वायएमसीए, श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, मॉडर्न स्कूल येथे होणार आहे. या प्रसंगी दिल्लीतील अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)