शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चळवळ्या क्रीडा पत्रकार हरपला

By admin | Updated: November 14, 2014 01:40 IST

देशी खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्याने झटणारे क्रीडा समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत यांचे गुरुवारी मुलुंड येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.

मुंबई : देशी खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्याने झटणारे क्रीडा समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत यांचे गुरुवारी मुलुंड येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. संत यांच्या निधनामुळे एक चळवळ्या पत्नकार हरपल्याची भावना क्रीडा क्षेत्रत व्यक्त होत आहे.
बुधवारपासून संत यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या छातीत असह्य वेदना होऊ लागल्या आणि राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी विक्रोळी टागोनगरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी खेळाडू, पत्रकारांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रीडा पत्नकारितेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे संत हे सुरुवातीला अभ्युदय बँकेत नोकरीला होते. मात्न, त्या नोकरीत त्यांचे मन फार काळ  रमले नाही. 1978च्या सुमारास ते ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये रुजू झाले. तेथे तब्बल 25 वर्षे क्रीडा पत्नकार म्हणून ते कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’मध्येही त्यांनी काम केले. आकाशवाणी व दूरदर्शनवरील सर्व प्रकारच्या खेळांच्या समालोचनामुळे ते महाराष्ट्राला परिचित होते. 1983 सालच्या क्रिकेट विश्वचषकाचे वृत्तांकन करण्यासाठी त्यांनी इंग्लंड दौराही केला होता. कपिलदेवची 175 धावांची संस्मरणीय खेळी ‘याची डोळा’ पाहण्याचे  भाग्य त्यांना लाभले होते. भारताला दोन्ही वेळा जगज्जेते होताना पाहणा:या भाग्यवान पत्रकारांपैकी संत हे एक होते. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरावरील क्रि केटवर त्यांनी विपुल लेखन केले होते. क्रिकेटकडे ओढा असला तरी पत्नकार म्हणून देशी खेळांकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ते सतत फिरत असायचे. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी असोत वा खेळाडू, संत हे प्रत्येकाच्या संपर्कात असायचे. एका अर्थाने ते मैदानावरचेच पत्नकार होते. कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी काढलेल्या जपान दौ:यातही ते सहभागी झाले होते.  ज्येष्ठ आणि कनिष्ठ पत्नकार असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. प्रत्येकाशी ते पटकन जुळवून घ्यायचे. त्यांच्या याच गुणांमुळे खेळाच्या अनेक संघटनांमध्ये विविध पदे भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली. या जबाबदा:याही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. या संघटनांच्या माध्यमांतूनही त्यांनी खेळाला, खेळाडूंना आणि क्रीडा पत्रकारांना सहकार्य केले.