शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या विजयाची अपेक्षा

By admin | Updated: March 12, 2015 00:29 IST

विश्वचषकात आतापर्यंत चढ-उताराचा सामना करणाऱ्या द. आफ्रिकेला उद्या गुरुवारी ‘ब’ गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात तुलनेत

वेलिंग्टन : विश्वचषकात आतापर्यंत चढ-उताराचा सामना करणाऱ्या द. आफ्रिकेला उद्या गुरुवारी ‘ब’ गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात तुलनेत दुबळ्या संयुक्त अरब अमिरातविरुद्ध (यूएई) मोठ्या विजयाची अपेक्षा राहील. मागच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील या संघाला आतापर्यंत संमिश्र यश मिळाले आहे. ‘ब’ गटात हा संघ भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्स मात्र आपल्या संघाला कमी लेखण्यास तयार नाही. भारत आणि पाककडून पराभूत झाल्यानंतरही आम्ही सर्वश्रेष्ठ असल्याचा त्याचा दावा आहे. तो म्हणतो, ‘माझ्यामते आमचा संघ अद्याप सर्वोत्कृष्ट आहे. साखळीत मिळालेल्या या दोन पराभवामुळे आम्हाला दु:ख झाले; पण अद्यापही आम्हीच बलाढ्य आहोत. विश्वचषक जिंकण्यासाठी आता काहीच सामने जिंकायचे आहेत.’एखादा बलाढ्य संघ कमकुवत संघाविरुद्ध खेळणार असेल, तर बेंच स्ट्रेंथचा संधी देण्याचा प्रयत्न करतो; पण डिव्हिलियर्स तसे करू इच्छित नाही. तो कुठलाही बदल करण्याच्या स्थितीत नाही. याबाबत तो म्हणतो, ‘सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंमध्ये फारसे बदल करणे परवडण्यासारखे नाही. ‘ब’ गटात दुसरे स्थान कायम ठेवायचे झाल्यास यूएईला हरवावेच लागेल. त्यामुळे क्वार्टरफायनल श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी राहील.’विश्वचषकात दुसऱ्यांदा खेळणाऱ्या यूएईने आतापर्यंत सर्व चारही सामने गमावले; पण या संघाचा कर्णधार मोहंमद तौकिर हा द. आफ्रिकेचा पाककडून झालेल्या २९ धावांच्या पराभवातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणाला,‘द. आफ्रिका पाककडून पराभूत होईल, अशी आशा नव्हती; पण खेळात काहीही घडू शकते हे निकालावरून स्पष्ट झाले. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगले आहे. सुरुवातीला काही बळी घेऊ शकलो, तर आफ्रिकेला दबावात आणू शकतो. द. आफ्रिका आमच्याविरुद्ध ४०० धावा काढेल, असे वाटत नाही. ’द. आफ्रिकेने आयर्लंड आणि विंडीजविरुद्ध ४०० वर धावा ठोकल्या. यूएई संघ गटात सर्वांत तळाच्या स्थानाला आहे. स्वत:चा दम दाखवित असोसिएट संघांची बाजू सावरण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल; अन्यथा पुढच्या विश्वचषकात खेळायला मिळणार नाही. तौकिरने २०१९ च्या विश्वचषकात १० ऐवजी १४ संघ असावेत, अशी आयसीसीला विनंती केली आहे. तो पुढे म्हणाला, ‘आमच्या क्रिकेटसाठी ही चांगली बातमी नाही. विश्वचषकात खेळणे हे आमचे मुख्य लक्ष्य असते.’(वृत्तसंस्था)