मुंबई : मॉरिशस चषक खुल्या आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेच्या एकेरी गटात महाराष्ट्राच्या स्नेहल मानेने मॉरिशसच्या अमिली बॉयवर सहज विजय मिळवला. गत दोन आठवड्यांतील स्नेहलचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय जेतेपद आहे. यामुळे अव्वल पाचशे खेळाडूंच्या क्लबमध्ये तिचा समावेश झाला आहे. एकेरी गटात पुण्याच्या १६ वर्षीय स्नेहलने एकातर्फी झालेल्या सामन्यात आक्रमक खेळाच्या जोरावर अमिली बॉयचा ६-३, ६-० असा एका तासाच्या खेळात दणदणीत पराभव केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}