शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, जयराम उपांत्य फेरीत पराभूत

By admin | Updated: January 17, 2015 23:59 IST

१ लाख २० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मलेशिया मास्टर्स ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

कुचिंग : (मलेशिया) विश्व बॅडमिंटन स्पर्धेत कास्यपदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या पी़ व्ही़ सिंधू व अजय जयराम यांना १ लाख २० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मलेशिया मास्टर्स ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.२०१३मध्ये स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या सिंधूला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते़ मात्र सेमीफायनलमध्ये तिला जपानच्या चौथे मानांकनप्राप्त नोजोमी ओकूहारा हिच्याकडून १ तास २४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत १९-२१, २१-१३, २१-८ असा पराभव स्वीकारावा लागला़ विशेष म्हणजे या सामन्यात सिंधूने पहिला गेम २१-१९ने आपल्या नावे केला होता़ मात्र यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही़ दुसरा गेम १३-३१ने हरल्यानंतर तिसऱ्या गेममध्ये सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूंपुढे गुडघे टेकले़ जपानच्या खेळाडूने हा गेम २१-८ असा एकतर्फी जिंकत स्पर्धेच्या फायनलमध्ये मजल मारली़ओकूहाराला फायनल लढतीत तृतीय मानांकनप्राप्त आपल्याच देशाच्या सयाका ताकाहाशी हिच्याशी झुंज द्यावी लागणार आहे़ सयाकाने अन्य उपांत्य लढतीत सयाका सातोंला २१-७, १४-२१, २१-२० अशा फरकाने धूळ चारली़ हा सामना अवघ्या ४९ मिनिटांत संपला़ (वृत्तसंस्था)च्भारताच्या पी़ व्ही़ सिंधूसह अजय जयरामलासुद्धा मलेशिया मास्टर्स ग्रां़ प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला़ जयरामला कोरियाच्या जिओन हियोक जिन याच्याकडून १०-२१, २१-१७, २१-१६ अशा फरकाने मात खावी लागली़ हा सामना ५८ मिनिटांपर्यंत चालला़