शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शशांक मनोहर ‘बुडते जहाज’ सोडून निघून गेले !

By admin | Updated: September 11, 2016 00:47 IST

बीसीसीआय कायदेशीर संकटांचा सामना करीत असताना अध्यक्ष या नात्याने शशांक मनोहरांनी हिमतीने सामना करायला हवा होता

ग्रेटर नोएडा : बीसीसीआय कायदेशीर संकटांचा सामना करीत असताना अध्यक्ष या नात्याने शशांक मनोहरांनी हिमतीने सामना करायला हवा होता. बुडत्या जहाजाला ‘कॅप्टन’ची गरज होती त्यावेळी ते निघून गेले.’ भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अ‍ॅड. शशांक मनोहर यांच्यावर टीका करीत शनिवारी त्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली.बीसीसीआयने आयसीसीला द्विस्तरीय कसोटी प्रणालीचा प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बजेटवरही आक्षेप नोंदविला. या विरोधानंतर मनोहर यांनी बीसीसीआयचे हित जोपासणे माझ्यासाठी अनिवार्य नाही, अशी भूमिका घेतली तर ठाकूर यांनी जाहीरपणे मनोहरांवर टीकेचे शस्त्र उगारले आहे.आयसीसीच्या मार्गात बीसीसीआय मोठा अडथळा...मनोहर यांच्या शंकास्पद भूमिकेला लक्ष्य करीत ठाकूर म्हणाले,‘आयसीसी चेअरमनच्या वक्तव्यामुळे काही फरक पडणार नाही. तथापि बोर्डातील माझे सदस्य काय विचार करतात हे अध्यक्ष या नात्याने सांगणे माझे कर्तव्य आहे. बोर्डाला अध्यक्ष या नात्याने मनोहर यांची गरज होती तेव्हा ते बुडत्या जहाजाला सोडून जाणाऱ्या कॅप्टनप्रमाणे आम्हाला सोडून चालले गेले. सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईसाठी आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहात होतो.’ बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनोहर हे क्रिकेट विश्वातील सुरक्षित स्थान शोधत होते, असा आरोप ठाकूर यांनी केला. आयसीसीतील १०५ सदस्यांपैकी कमकुवत सदस्यांसोबत उभे राहणे बीसीसीआयचे कर्तव्य आहे, हे मनोहर यांना समजले नसावे, असा टोला देखील त्यांनी मारला.झिम्बाब्वे, श्रीलंका, बांगला देश या देशांच्या पाठीशी उभे राहण्याची आज सर्वाधिक गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीनपट अधिक खर्च का होत आहे हे विचारण्याची गरज आहे. टीव्ही अधिकारातून मिळणाऱ्या पैशात काही देश भागीदारी मागत आहे. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या देशांना प्रसारण हक्क विकण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी बीसीसीआयला कसे जबाबदर धरू शकता, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला. फुटबॉल यासाठी लोकप्रिय झाला कारण या खेळाचे नियम लवकर लवकर बदलले जात नाहीत. आम्ही बदल स्वीकारण्यास तयार आहोत. गुलाबी चेंडूने दुलिप करंडक सामने खेळवित आहोत. पण आम्हाला घाई नाही. ‘रणजी’तील प्रयोगानंतर अहवालावर विस्तृत विचार केला जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)तर अन्य खेळांना मदत अशक्यबीसीसीआयला आयकरात मिळणारी सवलत परत घेण्यात आल्याने अन्य खेळांना मदत करणे शक्य होणार नसल्याचे बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले. ‘आम्ही अन्य खेळांना आर्थिक मदत करू इच्छितो. राष्ट्रीय क्रीडा विकास कोषात आम्ही ५० कोटी दिले पण पैसा कुठे खर्च झाला माहिती नाही. पैसा खर्च झाला नसेल तर आम्हाला परत द्यायला हवा. आयकरात मिळालेली सलवत काढून घेण्यात आल्याने अन्य खेळांची मदत करणे जमेनासे झाले आहे.आॅलिम्पिकमधील देशाच्या कामगिरीवर सर्वांनी मौन बाळगले. पण क्रिकेटमध्ये आम्ही चांगले काम करीत असताना बाहेरचा हस्तक्षेप वाढला आहे. बीसीसीआय संघटित संस्था असून सरकारचा एकही पैसा न घेता आम्ही प्रगती केली. लहान मोठ्या शहरांत विश्व दर्जाच्या सुविधा उभारण्यात आल्या, सर्वांना माहिती आहे.’आम्हाला एकाकी पाडण्याचा डाव...मनोहर यांनी आयसीसी चेअरमनपदाचा भार स्वीकारल्यापासून नवे पदाधिकारी बीसीसीआयला अलिप्त करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे नमूद करीत ठाकूर पुढे म्हणाले, ‘श्रीलंका आणि नेपाळ बोर्डात त्यांच्या सरकारने हस्तक्षेप केला त्यावेळी आयसीसीने चिंता व्यक्त केली पण लोढा समितीच्या शिफारशीमुळे बीसीसीआयच्या कारभारात हस्तक्षेपाचा प्रयत्न होतो आहे तेव्हा आयसीसी गप्प का?