शमीची लय नेहमीच आक्रमक असते - कोहली

By Admin | Updated: July 4, 2016 20:14 IST2016-07-04T20:14:46+5:302016-07-04T20:14:46+5:30

मोहम्मद शमी अत्यंत कसलेला खेळाडू असून सर्वांना ही बाब माहित आहे. त्याची गोलंदाजी कसोटी सामन्यांसाठी योग्य आहे

Shami's goal is always aggressive - Kohli | शमीची लय नेहमीच आक्रमक असते - कोहली

शमीची लय नेहमीच आक्रमक असते - कोहली

ऑनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. ४ : मोहम्मद शमी अत्यंत कसलेला खेळाडू असून सर्वांना ही बाब माहित आहे. त्याची गोलंदाजी कसोटी सामन्यांसाठी योग्य आहे. त्याची गोलंदाजीची लय नेहमी आक्रमक असते, अशा शब्दांत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केले.
२०१५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेपासून शमी दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या स्पर्धेनंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. वेस्ट इंडिज दौऱ्यातून तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कोहली पुढे म्हणाला, ह्यह्यज्या लाइन आणि लेंथने शमी गोलंदाजी करतो, ती नेहमी आक्रमक असते.

मग यावर बळी मिळो किंवा न मिळो, पण त्याची गोलंदाजी नेहमीच आक्रमक असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेंडू सीम करत असो किंवा स्विंग होत असो, तो नेहमी पारंपारिक मारा करु शकतो. चेंडू रिर्व्हस स्विंग होत असेल, तर टप्प कुठे ठेवायचा हे तो जाणून असतो.
ह्यह्यआम्ही त्याच्या खेळाच्या मानसिक बाजूवर काम करीत आहोत. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकूणच त्याची गोलंदाजी विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाला अत्यंत फायदेशीर राहील,ह्णह्ण असेही कोहलीने यावेळी सांगितले. 


 

Web Title: Shami's goal is always aggressive - Kohli