दुखापतग्रस्त शमी लंकेविरुध्द ‘आऊट’; धवल इन

By Admin | Updated: October 28, 2014 01:06 IST2014-10-28T01:06:38+5:302014-10-28T01:06:38+5:30

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुखापतीमुळे पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध आयोजित वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतीतून माघार घेतली आहे.

Shami is out against 'Lanka'; White in | दुखापतग्रस्त शमी लंकेविरुध्द ‘आऊट’; धवल इन

दुखापतग्रस्त शमी लंकेविरुध्द ‘आऊट’; धवल इन

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुखापतीमुळे पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध आयोजित वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतीतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने सोमवारी स्पष्ट केले की, ‘भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान 2 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणा:या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यांतून दुखापग्रस्त शमीने माघार घेतली आहे. त्याच्या स्थानी धवल कुळकर्णीला संधी देण्यात आली आहे.’ 
बोर्डाने शमीच्या दुखापतीबाबत काही स्पष्ट केलेले नाही. धवलला आंतरारष्ट्रीय क्रिकेटचा विशेष अनुभव नाही. शमीने 36 वन-डे सामन्यांत 68 बळी घेतले आहेत तर धवलने वन-डे क्रिकेटमध्ये अद्याप बळीचे खाते उघडलेले नाही. धवलने सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध भारताचे प्रतिनिधित्व केले होते, पण त्यावेळी त्याला बळीचे खाते उघडता आले नव्हते. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Shami is out against 'Lanka'; White in