श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी शहजाद पाक संघात

By Admin | Updated: June 4, 2015 01:19 IST2015-06-04T01:19:05+5:302015-06-04T01:19:05+5:30

गेल्या महिन्यात शिस्तीचे पालन न केल्यामुळे बांगलादेश मालिकेदरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघातून काढून टाकण्यात आलेल्या सलामीवीर

Shahzad Pakistan squad for Sri Lanka tour | श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी शहजाद पाक संघात

श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी शहजाद पाक संघात

कराची : गेल्या महिन्यात शिस्तीचे पालन न केल्यामुळे बांगलादेश मालिकेदरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघातून काढून टाकण्यात आलेल्या सलामीवीर अहमद शहजाद याचा १७ जूनपासून गॅले येथे श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पुनरागमन झाले आहे. शहजादशिवाय निवड समितीने गेल्या काही
मालिका आणि स्पर्धेदरम्यान दुर्लक्षित करण्यात आलेला अन्य एक सलामीवीर शान मसूद याला पुन्हा संघात स्थान दिले.
निवड समिती प्रमुख हारुण रशीद म्हणाले, खेळाडू जखमी असल्यामुळे त्यांची संघात निवड उशिरा झाली. जखमी खेळाडू एहसान आदिल याने फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि त्याचाही संघात समावेश केला आहे.
संघ : मोहंमद हफीज, अहमद शहजाद, शान मसूद, मिस्बाह-उल-हक (कर्णधार), युनूस खान, असद शफिक, हारिस सुहैल, अजहर अली, सरफराज अहमद, जुनैद खान, वहाब रियाज, एहसान आदिल, इमरान खान, जुल्फिकार बाबर आणि यासिर शाह.

Web Title: Shahzad Pakistan squad for Sri Lanka tour