सेव्हिला संयुक्त अग्रस्थानी; एटलेटिको माद्रिदही विजयी

By Admin | Updated: October 28, 2014 01:03 IST2014-10-28T01:03:52+5:302014-10-28T01:03:52+5:30

उत्तरार्धात केलेल्या दोन गोलमुळे सेव्हिला संघाने विलारीयाल संघाला 2-1 असे हरवून ला लिगा फुटबॉल स्पर्धेत संयुक्तपणो अग्रस्थान मिळविले आहे.

Sevilla United Front; Atletico Madrid also won | सेव्हिला संयुक्त अग्रस्थानी; एटलेटिको माद्रिदही विजयी

सेव्हिला संयुक्त अग्रस्थानी; एटलेटिको माद्रिदही विजयी

माद्रिद  : डेनिस सुआरेज आणि कालरेस बाका यांनी उत्तरार्धात केलेल्या दोन गोलमुळे सेव्हिला संघाने विलारीयाल संघाला 2-1 असे हरवून ला लिगा फुटबॉल स्पर्धेत संयुक्तपणो अग्रस्थान मिळविले आहे. गतविजेत्या एटलेटिको माद्रिदने काल, रविवारी गेटाफेला हरवून विजय साजरा केला. 
विलारीयाल संघाला सामना संपण्यास 11 मिनिटे उरली असताना लुसियानो विएटो याने गोल नोंदवून संघाला आघाडीवर आणले; पण सुआरेजने निर्धारित वेळ संपण्यापूर्वी दोन मिनिटे अगोदर सेव्हिलाला बरोबरीत आणले. इन्जुरीटाईममध्ये कालरेस बाका याने गोल नोंदवून आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला. गतविजेत्या एटलेटिको माद्रिद संघाने गेटाफेला 1-0 असे हरवून अव्वल पाच संघांत आपले स्थान निश्चित केले. सामन्यातील हा एकमेव गोल मोरियो मांदजुकिक याने पूर्वार्धात केला. सेव्हिला आणि एटलेटिको यांच्या विजयानंतर अव्वल पाच संघांत फक्त दोन गुणांचे अंतर आहे. तत्पूर्वी, अन्य एका सामन्यात मलागा संघाने रायो वाल्कानो संघाला 4-0 गोलफरकाने हरविले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sevilla United Front; Atletico Madrid also won