सेरेना विलियम्स 'रेडिट'च्या को-फाउंडरसोबत करणार लग्न

By Admin | Updated: December 30, 2016 16:04 IST2016-12-30T16:04:13+5:302016-12-30T16:04:13+5:30

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विलियम्स आपल्या बॉयफ्रेंडला आयुष्याचा जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Serena Williams is married to 'co-founder of Reddit' | सेरेना विलियम्स 'रेडिट'च्या को-फाउंडरसोबत करणार लग्न

सेरेना विलियम्स 'रेडिट'च्या को-फाउंडरसोबत करणार लग्न

ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. 30 - अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विलियम्स आपल्या बॉयफ्रेंडला आयुष्याचा जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सेरेन एक वर्षांपासून 'रेडिट'चा को-फाउंडर एलेक्सिस ओहेनियनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यादरम्यान एलेक्सिसने लग्नाची मागणी घातल्यानंतर सेरेनाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. विलियम्सने सुंदर कवितेच्या माध्यमातून ही गोड बातमी 'रेडिट'वर शेअर केली आहे. 
 
'ज्या ठिकाणी पहिल्यांदा आपण योगायोगाने भेटलो होतो, मात्र यावेळी हा योगायोग नाही तर ठरवून भेटलो. गुघड्यांवर बसून त्याने 4 शब्दांच्या माध्यमातून मला विचारले आणि मी हो म्हणाले'. यानंतर ओहेनियनने ही कविता स्वतःच्या फेसबुक वॉलवर शेअर करत, 'तिने हो म्हटले', अशी पोस्ट शेअर केली. 
 
'तू मला जगातील सर्वांधिक खूश व्यक्ती बनवले आहेस', अशी प्रतिक्रिया ओहेनियनने सेरेनाने 'रेडिट'वर पोस्ट केलेल्या कवितेवर दिली आहे. विलियम्सने कवितेच्या माध्यमातून सांगितले की, 'जेव्हा ती घरी आली तेव्हा ओहेनियन सरप्राईज ट्रिपवर घेऊन जाण्यासाठी तिची बॅग भरली होती. ते दोघं रोमला जाणार होते,  ज्याठिकाणी त्या दोघांची पहिली भेट झाली होती.  
विलियम्स आणि ओहेनियन नोव्हेंबर 2015 मध्ये सेन फ्रान्सिस्कोमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. 

Web Title: Serena Williams is married to 'co-founder of Reddit'