शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

चंडीगड, पतियाळा उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 14, 2015 02:01 IST

राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी चषक स्पर्धेत चंडीगड, पतियाळा व नामधारी इलेव्हन संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्य फेरीत धडक मारली.

पुणे : राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी चषक स्पर्धेत चंडीगड, पतियाळा व नामधारी इलेव्हन संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्य फेरीत धडक मारली. उत्कंठावर्धक लढतीत हिमाचलने मणिपूरचा सडनडेथमध्ये पराभव करीत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. चंडीगड संघाने दिल्लीचा ७-० असा धुव्वा उडवित दिमाखात उपांत्य फेरी गाठली. चंडीगड संघाकडून गगनदीप सिंग (१८, ३८ मि़), हरवंत सिंग (१९ मि़), बलविंदर सिंग (२८, ४१ मि़), गुरजिंदर सिंग (४६ मि़), नवदीपसिंग (५३ मि़) यांच्या उत्कृष्ट खेळी करीत दिल्लीच्या बचाव फळीला भगदाड पाडले. पतियाळाने विदर्भाला ४-२ असे नमवून आगेकूच केली. विदर्भाच्या तौसिफ बेग याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटात गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. तर पतियाळाच्या अजय कुमार याने दहाव्या मिनिटास गोल करीत संघाला १-१ बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात सामन्यावर पकड मिळवित पतियाळाने आघाडी ४ पर्यंत वाढविली. तरणजितसिंग (४८ मि़), अर्जुन सिंग (५९ मि़) यांनी गोल करीत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. तत्पूर्वी अकबर खान (४४ मि़) याने उत्तरार्धात गोल करीत आघाडी २-४ अशी कमी केली. नामधारी इलेव्हन संघाने सीआयएसएफ संघाचा टायब्रेकमध्ये २-१ असा पराभव करीत पुढील फेरी गाठली. निर्धारित वेळेत नामधारी कडून अवतार सिंग (१२ मि़) व सायरील एक्का (६० मि़) यांनी गोल केला. टायब्रेकमध्ये विजयी संघाकडून कुलदीप सिंग व बिशन सिंग गोल करीत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. पराभूत संघाकडून एक्का गोल करण्यात यशस्वी ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)अन्य निकालच्हिमाचलने मणिपूरचा सडनडेथमध्ये १-० असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. निर्धारित वेळेत सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. च्मणिपूरच्या प्रेमचंद (१० मि़), बंटी सिंग (१७ मि़) यांनी संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. च्त्यानंतर हिमाचलच्या विनोद दुर्गा (१८ मि़), नौरवी (४७ मि़) व अजय सिंग (५०) यांनी पिछाडीवरून संघाला आघाडी मिळवून दिली च्त्याआधी बंटी सिंगाने ५७व्या मिनिटाला गोल करीत मणिपूरलाला ३-३ बरोबरी साधून दिलेली.