शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा दिवस पावसाचा

By admin | Updated: January 4, 2016 23:53 IST

आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामन्यात पावसामुळे फक्त ११.२ षटकांचा खेळ होऊ शकला; परंतु त्यातही कार्लोस ब्रेथवेटने वादळी फलंदाजी करताना

सिडनी : आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामन्यात पावसामुळे फक्त ११.२ षटकांचा खेळ होऊ शकला; परंतु त्यातही कार्लोस ब्रेथवेटने वादळी फलंदाजी करताना उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले.वेस्ट इंडीजने आज ६ बाद २0७ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि ७ बाद २४८ अशी धावसंख्या असतानाच पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर खेळ होऊ शकला नाही.ब्रेथवेटने आज आक्रमक पावित्रा अवलंबताना उपाहारानंतर जेम्स पॅटिन्सनला दोन षटकार ठोकले. त्याने पॅटिन्सनच्या चेंडूवर पहिले कव्हर आणि नंतर बॅकवर्ड स्क्वेअरलेगला षटकार ठोकला. तथापि, पॅटिन्सनने त्याच्या पुढच्या षटकात या अष्टपैलू खेळाडूला त्रिफळाबाद केले. ब्रेथवेटने ७१ चेंडूंत ७ चौकार, ४ षटकारांसह ६९ धावा केल्या. तथापि, तो सिडनी क्रिकेट मैदानावर उपस्थित १४ हजार २६६ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. ब्रेथवेटला शतक न झळकावण्याची खंत वाटतेय. तो म्हणाला, ‘‘मी शतकापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे निराश आहे; परंतु कसोटी क्रिकेटमधील माझी सर्वोच्च खेळी करण्यात यशस्वी ठरल्याने आनंदी आहे.’’ पावसामुळे जेव्हा दिवसाचा खेळ संपला तेव्हा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन ३0 धावांवर खेळत होता, तर केमार रोचने खातेदेखील उघडले नव्हते. मंगळवारीदेखील पावसाचे भाकित करण्यात आले आहे.आॅस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवताना याआधीच फ्रँक वॉरेल करंडक आपल्या नावावर केला होता.संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज पहिला डाव : ७ बाद २४८. (क्रेग ब्रेथवेट ८५, कार्लोस ब्रेथवेट ६९, ब्राव्हो ३३, दिनेश रामदिन खेळत आहे ३0, पॅटिन्सन २/६७, लियोन २/७८).