सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल

By Admin | Updated: August 22, 2016 09:51 IST2016-08-22T09:51:08+5:302016-08-22T09:51:08+5:30

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने महिला दुहेरीत पहिलंवहिलं विजेतेपद मिळवलं आहे

Sania Mirza leads the world's doubles world rankings | सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल

सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल

>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने महिला दुहेरीत पहिलंवहिलं विजेतेपद मिळवलं आहे. सानिया आणि बार्बरा स्ट्रायकोव्हाने सिनसिनाटी ओपन जिंकली आहे. या विजयासोबतच सानियाने महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत वैयक्तिकरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या आधी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होत्या.
 
विशेष म्हणजे, सिनसिनाटी ओपनच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झानं आपली आधीची सहकारी मार्टिना हिंगिसला धूळ चारली. या सामन्यात सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीनं मार्टिना हिंगिस आणि कोको वॅन्देवेग जोडीवर 7-5, 6-4 असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.
 

Web Title: Sania Mirza leads the world's doubles world rankings