सानिया-हिंगीसचा सलग ४१ वा विजय

By Admin | Updated: February 25, 2016 03:47 IST2016-02-25T03:47:09+5:302016-02-25T03:47:09+5:30

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने तिची साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने डब्लूटीए कतार ओपनमध्ये चीनच्या यी फानशू आणि सेसेई झेंगला तीन सेटमध्ये पराभूत केले.

Sania-Hingis's 41st consecutive win | सानिया-हिंगीसचा सलग ४१ वा विजय

सानिया-हिंगीसचा सलग ४१ वा विजय

दोहा : भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने तिची साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने डब्लूटीए कतार ओपनमध्ये चीनच्या यी फानशू आणि सेसेई झेंगला तीन सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यातील विजय हा या जोडीचा सलग ४१ वा विजय आहे. अग्रमानांकित सानिया आणि हिंगीसने एक तास २४ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ४-६, १०-४ असा विजय मिळविला आणि स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि हिंगीसला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. दोघींनी या वर्षात चार स्पर्धेत विजय मिळवला आहे. त्यासोबतच त्यांनी एकूण १३ स्पर्धांमध्ये विजय मिळवला. दोघींनी ब्रिस्बेन, सिडनी, आॅस्ट्रेलिया ओपन, सेंट पीटस्बर्ग या स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता.

Web Title: Sania-Hingis's 41st consecutive win