शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सायनाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: April 30, 2016 22:01 IST

जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाची खेळाडू भारताची सायना नेहवाल शनिवारी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या वांग

वुहान : जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाची खेळाडू भारताची सायना नेहवाल शनिवारी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या वांग यिहानविरुद्धच्या लढतीत पराभूत झाली. तिच्या या पराभवाने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.स्पर्धेत पाचव्या मानांकित सायनाला सेमी फायनलमध्ये सहाव्या मानांकित चीनच्या वांग यिहानविरुद्ध ४१ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१४, २१-१६ अशा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाबरोबरच सायनाचे जागतिक क्रमवारीतील सहाव्या रँकिंगच्या यिहानविरुद्ध कारकिर्दीतील रेकॉर्ड ४-११ असे झाले आहे.पायाच्या घोट्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या लंडन आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची आशा असणाऱ्या सायनाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावले; परंतु तिला पराभव पत्करावा लागला. याआधी सायनाला स्वीस ग्रांप्री गोल्ड, इंडिया सुपर सिरीज आणि मलेशिया सुपर सिरीज प्रीमियर ओपनमध्येदेखील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. सायनाने या लढतीत वांगविरुद्ध ३-० अशी आघाडी घेतली होती आणि ती ९-६ अशी वाढवली होती; परंतु प्रतिस्पर्धी चिनी खेळाडूने मुसंडी मारताना मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या गेममध्ये वांगचे वर्चस्व राहिले व तिने सुरुवातीलाच ५-० अशी आघाडी घेतली आणि ती पुढेही कायम ठेवली. त्याचबरोबर भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.(वृत्तसंस्था)