टी २० सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा

By Admin | Updated: January 19, 2017 12:14 IST2017-01-19T00:56:14+5:302017-01-19T12:14:37+5:30

भारत व इंग्लंड दरम्यान २६ रोजी ग्रीन पार्क मैदानात टी २० क्रिकेट सामना होणार आहे

Rugged security for the T20 match | टी २० सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा

टी २० सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा


कानपूर : भारत व इंग्लंड दरम्यान २६ रोजी ग्रीन पार्क मैदानात टी २० क्रिकेट सामना होणार आहे. या सामन्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी कडेकोट व्यवस्था केली आहे. खेळाडूंच्या हॉटेलपासून ते ग्रीन पार्क मैदानापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस बंदोबस्त २३ ते २७ जानेवारीपर्यंत कायम राहील. कानपूरचे एसएसपी आकाश कुलहरी यांनी सांगितले की, ‘‘तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. डीएव्ही ते ग्रीनपार्क, ग्रीनपार्क ते परेड तिराहा आणि हॉटेल लॅण्डमार्क पर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Rugged security for the T20 match