मार्श बंधू इतिहास नोंदविण्यास सज्ज

By Admin | Updated: December 17, 2014 01:34 IST2014-12-17T01:34:40+5:302014-12-17T01:34:40+5:30

आॅस्ट्रेलियाचे मार्श बंधू शॉन व मिशेल बुधवारी भारतीय दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर उतरतील त्यावेळी त्यांची आॅस्ट्रेलियातर्फे एकाच कसोटी

Ready to report the history of Marsh Brother | मार्श बंधू इतिहास नोंदविण्यास सज्ज

मार्श बंधू इतिहास नोंदविण्यास सज्ज

ब्रिसबेन : आॅस्ट्रेलियाचे मार्श बंधू शॉन व मिशेल बुधवारी भारतीय दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर उतरतील त्यावेळी त्यांची आॅस्ट्रेलियातर्फे एकाच कसोटी सामन्यात खेळणाऱ्या बंधूंच्या यादीमध्ये नोंद होईल.
फेब्रुवारी महिन्यापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ३१ वर्षीय शॉन मार्शला दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्कच्या जागी संघात स्थान मिळाले आहे, तर आॅक्टोबरमध्ये पदार्पणाची कसोटी खेळणारा तेवीस वर्षीय मिशेल बुधवारी कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळणार आहे.
ही परंपरा १८७७ मध्ये आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापासून प्रारंभ झाली. त्यावेळी डेव व नेड ग्रेगरी हे खेळले होते. त्यानंतर १९७० च्या दशकात इयान व ग्रेग चॅपेल या प्रसिद्ध जोडीने ४३ सामने एकत्र खेळले. दोघांनी कर्णधारपदही भूषविले होते. आॅस्ट्रलियातर्फे सोबत खेळणाऱ्या बंधूंमध्ये सर्वांत मोठी जोडीमध्ये स्टीव्ह व मार्क वॉ यांचा क्रमांक लागतो. त्यांनी २००२ मध्ये १०८ व्या कसोटी सामन्यांतील अखेरची लढत खेळली होती.
मार्श बंधूंचे पिता ज्योफ मार्श यांनी सलामीवीर म्हणून आॅस्ट्रेलियातर्फे ५० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजाविली आहे. दोन शतके झळकाविणाऱ्या शॉनने त्याचा लहान बंधू अष्टपैलू मिशेल मार्शच्या साथीने खेळणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला. शॉन म्हणाला, आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून ज्या दिवसाची प्रतीक्षा करीत होतो, अखेर तो दिवस आला आहे. आम्ही या कसोटी सामन्याबाबत उत्सुक आहोत. (वृत्तसंस्था)

Web Title: Ready to report the history of Marsh Brother