शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीविरुद्ध राजस्थानचा विजय

By admin | Updated: May 4, 2015 00:52 IST

अजिंक्य रहाणेची ५४ चेंडूंत ९१ धावांची नाबाद खेळी, करुण नायरचा (६१) अर्धशतकीय तडाखा आणि त्यानंतर बिन्नी, वॉटसन आणि धवल कुलकर्णी या त्रिकुटाचे

मुंबई : अजिंक्य रहाणेची ५४ चेंडूंत ९१ धावांची नाबाद खेळी, करुण नायरचा (६१) अर्धशतकीय तडाखा आणि त्यानंतर बिन्नी, वॉटसन आणि धवल कुलकर्णी या त्रिकुटाचे प्रत्येकी दोन बळीयांच्या जोरावर माजी विजेत्या राजस्थानने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४ धावांनी मात केली. राजस्थानच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० षटकांत ७ बाद १७५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. प्रत्युत्तरात, दिल्लीकडून कर्णधार जे. पी. ड्युमिनीने (५६) एकाकी झुंज दिली. इतर फलंदाजांचे योगदान तोकडे पडले. मयंक अग्रवाल (११), अय्यर (९) हे झटपट बाद झाले. युवराजने ड्युमिनीसोेबत संघर्ष केला. मात्र, तो २२ धावा काढून बाद झाला. अ‍ॅँजेलो मॅथ्यूज (१६), केदार जाधव (११) यांनाही विशेष योगदान देता आले नाही.सौरभ तिवारीने नाबाद २८ धावा केल्या. त्याआधी, ब्रेबोर्न स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलमधील ३६व्या या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ड्युमिनीच्या या निर्णयाला सलामीवीर अजिंक्य रहाणेने आव्हान दिले. वॉटसन आणि रहाणे या सलामीवीरांनी सुरुवातीपासून चौफेर फटकेबाजी केली. अवघ्या ४० चेंडूंत त्यांनी संघाचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर वॉटसन मॅथ्यूजच्या चेंडूवर जाधवकरवी झेलबाद झाला. वॉटसनने २४ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. शेन वॉटसन बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि करुण नायर या जोडीने सर्व सूत्रे स्वीकारली. त्यांनी दिल्ली गोलंदाजांची धुलाई केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. रहाणेने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने ३३ चेंडूंत नायरनेही अर्धशतक गाठले. या जोडीने ६३ चेंडूंत शतकी भागीदारी केली. १९ व्या षटकात नायर नाइलच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात मिश्राकरवी झेलबाद झाला. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा चोपल्या. त्यानंतर जेम्स फॉल्कनर आणि रहाणे या जोडीने राजस्थानला १८९ धावसंख्येपर्यंत आणले. अजिंक्यने ५४ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१, तर फॉल्कनरने नाबाद ८ धावा केल्या. दिल्लीकडून नाइल आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)