द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास रैना उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 23:58 IST2015-09-15T23:58:38+5:302015-09-15T23:58:38+5:30

भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमनाच्या प्रयत्नात व्यस्त असलेला फलंदाज सुरेश रैना माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पुनश्च खेळण्याबाबत उत्साही आहे़ रैनाला

Raina keen to play under Dravid's guidance | द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास रैना उत्सुक

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास रैना उत्सुक

बंगळुरू : भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमनाच्या प्रयत्नात व्यस्त असलेला फलंदाज सुरेश रैना माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पुनश्च खेळण्याबाबत उत्साही आहे़ रैनाला भारत ‘अ’ संघामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, बांगलादेश अ विरुद्ध बंगळुरुमध्ये वन-डे सामन्यामध्ये खेळणार आहे़ रैना म्हणाला, जेव्हा द्रविड कर्णधार होते, तेव्हा मी खूपच मेहनत घेतली होती़ माझ्यात खूपच आत्मविश्वास होता़ आणि एक कोच म्हणून पुन्हा एकदा मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळावयाचे असून, मी खूपच उत्साहित आहे़

Web Title: Raina keen to play under Dravid's guidance