शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

रहाणेच्या शतकाने डाव सावरला

By admin | Updated: July 18, 2014 02:09 IST

नॉटिंगहॅम कसोटीतील वादाचे सावट लॉडर््स कसोटीवरही पाहायला मिळाले. लॉडर््सचे मैदान सर्वोत्कृष्ट कोण आहे हे ठरवण्यासाठीच्या लढाईचे ठिकाण बनले आहे.

लंडन : नॉटिंगहॅम कसोटीतील वादाचे सावट लॉडर््स कसोटीवरही पाहायला मिळाले. लॉडर््सचे मैदान सर्वोत्कृष्ट कोण आहे हे ठरवण्यासाठीच्या लढाईचे ठिकाण बनले आहे. लॉर्ड््सच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक याने नाणेफेक जिंंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नॉटिंगहॅम हे गोलंदाजांचे कर्दनकाळ होते तर लॉर्ड्स फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरण्याची शक्यता आहे. इंग्लडच्या मदतीला सूर्यही धावून आला. पहिल्या सत्रात सूर्याने क्वचितच दर्शन दिल्यामुळे याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांनी उठवला. इंग्लंडचे गोलंदाज हातात रिमोट कंट्रोल असल्यासारखे चेंडू हवा तसा स्विंग करत होते. सामन्यातील पहिल्या चेंडूपासूनच खेळपट्टीने आपले रंग दाखवायला सुरु केले. वेस्ट इंडिजचे महान खेळाडूू मायकल होल्डिंग्ज म्हणाले,‘ या खेळपटट्ीवर जर तुम्हाला लवकर बळी मिळत नसतील तर तुम्ही योग्य गोलंदाजी करत नाही आहात.’भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी भारताची ६ बाद १४० अशी निशाजनक स्थिती होती. मात्र अजिंक्य रहाणे याने तळाच्या फलंदांजांना बरोबर घेत डावाला आकार दिला व भारताला ९ बाद २९० अशी आव्हानात्मक धावसंख्या करता आली. अजिंंक्य रहाणे याने १०३ धावा केल्या. भुवनेश्वर बाद झाल्यानंतर रहाणेने मोहम्मद शमीच्या साथीने शतक पूर्ण केले. रहाणेची शतकी खेळी अ‍ॅन्डरसनने संपुष्टात आणली. त्यानंतर मोहम्मद शमी (नाबाद १४) व ईशांत शर्मा (नाबाद १२) यांनी दिवसअखेर नाबाद राहत भारताला ९ बाद २९० धावांची मजल मारुन दिली. तत्पुर्वी सलामीविर शिखर धवन (७) याला जेम्स अ‍ॅन्डरसनने झटपट माघारी परतवत यजमान संघाला पहिले यश मिळवून दिले. धवन तिसऱ्या स्लिपमध्ये तैनात गॅरी बॅलेन्सकडे झेल देत माघारी परतला. सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सुदैवी ठरलेल्या मुरली विजयला (२४) त्याचा लाभ घेता आला नाही. लियम प्लंकेटने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर आलेलल्या चेतेश्वर पुजारा (२८) व विराट कोहली (२५) यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीही (०१) लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या सत्रात सूर्य ढगाआडून बाहेर आला मात्र तरीही खेळपटटीने आपले रंग बदलले नाही. या सर्व परिस्थितीत अजिंक्य रहाणे एखाद्या सम्राटाप्रमाणे खेळला. आपल्या तंत्रशुद्ध खेळीने त्याने इंग्लडच्या गोलंदाजांची परीक्षा पाहिली. त्याने काही अत्यंत सुंदर फटके मारले. त्याने शतक झळकावल्यानंतर लॉर्डच्या गॅलरीत उभे राहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले.इंग्लंडतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज अ‍ॅन्डरसनने ५५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. ब्रॉडने २ तर प्लंकेट, स्टॉक्स व मोईन अली यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.