शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पी.व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीत पराभूत

By admin | Updated: October 21, 2016 01:07 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचा डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभव

ओडेनसे : रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचा डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभव झाला. जपानच्या सयाका सातोविरुध्द झालेल्या या अनपेक्षित पराभवामुळे सिंधूला गाशा गुंडाळावा लागला. त्याचवेळी, अजय जयराम आणि एचएस प्रणय यांचाही दुसऱ्या फेरीत पराभव झाल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर बरोबरी साधूनही सातत्य राखण्यात अपयश आल्याने सिंधूला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. एक तास आणि पाच मिनिटांपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या जपानच्या सयाकाच्या आक्रमकतेपुढे सिंधूला १३-२१, २३-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. तत्पुर्वी, सिंधूने चीनच्या बिंगजियाओला केवळ ३३ मिनिटांमध्येच २१-१४, २१-१९ असे लोळवून दिमाखात विजयी सलामी दिली होती. दुसरीकडे पुरुषांच्या गटातही भारताच्या पदरी निराशाच आली. चीनच्या शी युकीविरुध्द झालेल्या रोमांचक सामन्यात मोक्याच्यावेळी कच खाल्ल्याने अजय जयरामला २१-२३, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले. पहिल्या गेममध्ये कडवी टक्कर दिलेल्या अजयकडून दुसऱ्या गेममध्ये पुनरागमनाची आशा होती. मात्र, युकीने मोक्याच्यावेळी आक्रमक खेळ करताना घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना सहज बाजी मारुन आगेकूच केली.तसेच, प्रणयला मलेशियाचा बलाढ्य लीग चोंग वेईविरुध्द १०-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्याने जबरदस्त झुंज दिली. मात्र अनुभवी वेईने प्रणयच्या माफक चुकांचा अचूक फायदा घेत बाजी मारली. (वृत्तसंस्था)