शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

फिलिप ह्यूजचे निधन ही केवळ दुर्दैवी घटना!

By admin | Updated: November 5, 2016 05:38 IST

डोक्यावर बाऊन्सर आदळताच आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा २५ नोव्हेंबर २०१४ ला मृत्यू झाला.

सिडनी : डोक्यावर बाऊन्सर आदळताच आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा २५ नोव्हेंबर २०१४ ला मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मीडियात चर्चा रंगल्या. न्यू साऊथवेल्सच्या कोरोनर्स न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालात ही केवळ दुर्दैवी घटना होती, असे संबोधले आहे.प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मत नोंदविले की, आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजासोबत घडलेल्या दुर्दैवी प्रकाराची घटना सुरक्षा उपायातील चूक किंवा खेळाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे झालेली नाही. मैदानावर घडलेला तो दुर्दैवी प्रकार होता. सिडनी क्रिकेट मैदानावर स्थानिक सामन्यात साऊथ आॅस्ट्रेलियाच्या ह्यूजच्या मानेच्या मागच्या भागावर बाऊन्सर आदळला होता. दोन दिवसांनंतर इस्पितळात त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची समीक्षा आणि घटना टाळता आली असती काय, याची शहानिशा करणारे अधिकारी मायकेल बार्नेस म्हणाले, ‘ह्यूज असुरक्षित माहोलमध्ये खेळत असल्याचे मला कुठलेही पुरावे आढळले नाहीत. ह्यूजच्या कुटुंबाने हा आरोप केला होता. त्यांच्या कुटुंबातील युवा सदस्य गेल्याचे दु:ख त्यांना असेल; पण माझ्या चौकशीत असे काहीही आढळले नाही. खेळाच्या सर्व नियमांचे पालन झाले होते, हे सत्य ह्यूजच्या कुटुंबाने स्वीकारावे, असे माझे मत आहे.’आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ह्यूजच्या निधनापासून धडा घेत मे महिन्यात सर्वच फलंदाजांना हेल्मेट घालणे अनिवार्य केले होते. ह्यूजला खेळतेवेळी अनेक आखूड टप्प्याच्या चेंडूंना तोंड द्यावे लागले; पण हे सर्व खेळाच्या नियमानुसारच होते, असेही बार्नेस यांनी नमूद केले. न्यायालयाच्या मते, ह्यूजला खेळादरम्यान स्लेजिंगचा सामना करावा लागला होता काय, याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, पण क्रिकेटसारख्या सुंदर खेळाला स्लेजिंगची गरजच नाही.’ (वृत्तसंस्था)>ह्यूजच्या निधनानंतर त्याच्या हेल्मेटवरूनही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते; पण बार्नेस यांच्या मते, हेल्मेट असताना ह्यूजसोबत घडलेला तो प्रकार टाळणे कठीण होते.