सुखद आठवणींसह पेले कोलकात्याहून रवाना

By Admin | Updated: October 14, 2015 23:57 IST2015-10-14T23:57:31+5:302015-10-14T23:57:31+5:30

महान फुटबॉलपटू पेले सुखद आठवणींसह तीनदिवसीय कोलकता दौऱ्यानंतर दिल्लीकडे रवाना झाले. पेले म्हणाले, ‘‘मी पुन्हा येईन, अशी आशा आहे. आभार कोलकाता!’’

Pele leaves Kolkata with happy memories | सुखद आठवणींसह पेले कोलकात्याहून रवाना

सुखद आठवणींसह पेले कोलकात्याहून रवाना

कोलकाता : महान फुटबॉलपटू पेले सुखद आठवणींसह तीनदिवसीय कोलकता दौऱ्यानंतर दिल्लीकडे रवाना झाले. पेले म्हणाले, ‘‘मी पुन्हा येईन, अशी आशा आहे. आभार कोलकाता!’’
तीन वेळेसच्या वर्ल्डकपविजेत्या संघातील पेले कोलकाता येथून दिल्लीला रवाना झाले. त्यांनी जाण्याआधी ब्लड कॅन्सरच्या रोग्यांसाठी ‘निरोगी राहा’ असा संदेश लिहिला. पेले यांनी आमच्या रुग्णालयातील ल्युकेमिया विभागाचे उद्घाटन केल्याचे अपोलो रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पेले यांची स्वाक्षरी घेण्यासाठी मोठ्या संख्येने व्हीआयपी उपस्थित होते; परंतु पेले यांनी त्यांना निराश केले नाही.
पेले यांनी त्यांच्या अधिकृत टिष्ट्वटरवर लिहिले, ‘मला जे प्रेम मिळाले, ते खूपच सुंदर होते. जेव्हा मी याआधी पहिल्यांदा आलो, त्या माझ्या ३८ वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाला. मी परमेश्वराचे आभार मानतो. ज्यांनी मला येथे येण्याची संधी
दिली. भारताचा हा माझा दुसरा दौरा होता.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Pele leaves Kolkata with happy memories