शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी पडली महागात...

By admin | Updated: January 14, 2016 03:09 IST

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या निराशाजनक दौऱ्यामध्ये मद्यप्राशन करणे आणि महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रात्रभर पार्टी करून बेशिस्तपणाच्या वर्तनासाठी श्रीलंका क्रिकेट संघाला

कोलंबो : नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या निराशाजनक दौऱ्यामध्ये मद्यप्राशन करणे आणि महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रात्रभर पार्टी करून बेशिस्तपणाच्या वर्तनासाठी श्रीलंका क्रिकेट संघाला आता कठोर चौकशीला सामोरे जावे लागेल. न्यूझीलंड दौऱ्याहून नुकत्याच परतलेल्या श्रीलंका संघासाठी ही मोठी अडचण ठरली आहे.विशेष म्हणजे, यावृत्ताबाबत श्रीलंकाच्या क्रीडा मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. क्रीडामंत्री दयाश्री जयशेखर यांनी सांगितले की, त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी रात्रभर पार्टी करणाऱ्या श्रीलंकाई खेळाडूंचे छायाचित्र मिळाले आहे. या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात श्रीलंका संघाला दारूण पराभवास सामोरे जावे लागले असल्याने त्यांना चौकशीस सामोरे जावे लागेल.जयशेखर यांनी सांगितले की, महत्त्वाच्या सामन्यापूर्वी खेळाडूंनी मद्यप्राशन व पार्टीच केली. शिवाय संघामध्येही तणावाचे वातावरण आहे. संघ देशात परतल्यानंतर मी खेळाडू आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डचे नवे अध्यक्ष थिलांगा सुमाथिपाला यांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. तसेच, खेळाडूंचे वर्तन माझ्यासाठी मुख्य चिंतेचे कारण होते. कारण जेव्हा बेशिस्तपणा असतो, तेव्हा साहजिकच कामगिरी खालावते, असेही जयशेखर यांनी सांगितले.