शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास; लवकरच होणार सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 21:37 IST

Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला जाणार आहे.

Neeraj Chopra Surgery : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदकावर आपले नाव कोरले. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर भाला फेकला, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, आता नीरजशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. नीरजला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास आहे. लवकरच त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया होणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हर्नियामुळे अनेक दिवसांपासून नीरजला कंबरेत वेदना होत आहेत. आता लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत नीरजने फार कमी स्पर्धा खेळल्या, त्यामागे हर्नियाचे कारण मानले जात आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजकडे विश्रांतीसाठी वेळ असल्यामुळे त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. 

नीरजचा कोचिंग स्टाफ बदलणारदरम्यान, नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफशी संबंधितही एक मोठी माहिती समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकूनही नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल होणार आहे. नीरज चोप्राचे सध्याचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्झ आता त्याच्यासोबत राहणार नाहीत. क्लॉस बार्टोनिट्झ गेल्या सहा वर्षांपासून नीरजला प्रशिक्षण द्यायचे. पण, आता नीरजला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल हवाय.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावे 5 पदकेपॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकांवर आपले नाव कोरले आहे. यात 4 कांस्य आणि 1 रौप्यपदक आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर शुटिंगमध्ये पहिले कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. त्यानंतर हॉकी संघानेही कांस्यपदकाची कामगिरी केली. शेवटी नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Healthआरोग्य