शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाक क्रिकेट संघ आज दिल्लीत दाखल होणार?

By admin | Updated: March 9, 2016 05:13 IST

पाकिस्तानी क्रिकेट संघ विश्वचषक टी-२० स्पर्धेसाठी उद्या (बुधवारी) नवी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि, भारतात होत असलेल्या या स्पर्धेदरम्यान पाक संघाच्या सुरक्षाव्यवस्थेच्या

कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ विश्वचषक टी-२० स्पर्धेसाठी उद्या (बुधवारी) नवी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि, भारतात होत असलेल्या या स्पर्धेदरम्यान पाक संघाच्या सुरक्षाव्यवस्थेच्या मंजुरीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक संघातील सर्व अधिकारी आणि खेळाडूंना मंगळवारी रात्रीपर्यंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचण्यास सांगण्यात आले. खेळाडू तसेच अधिकाऱ्यांना बुधवारी भारताकडे निघण्याचे संकेत देण्यात आले. राष्ट्रीय अकादमीत पीसीबीप्रमुख खेळाडूंना शुभेच्छा देतील. त्यानंतर सर्व खेळाडू लाहोर विमानतळाकडे रवाना होणार आहेत. पण टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात जाण्याबाबत पाकिस्तान बोर्डाकडून कोणतीही निश्चित सूचना खेळाडू व व्यवस्थापकांना देण्यात आलेली नाही.पाक संघाला नवी दिल्लीतून कोलकाता येथे दाखल व्हायचे आहे. तेथे संघाचे ओपन मीडिया सेशन आटोपल्यानंतर तेथेच त्यांना वेस्ट इंडीजविरुद्ध सराव सामनादेखील खेळायचा आहे. पाक सरकारने मात्र अद्यापही संघाला भारताकडे रवाना होण्याची अधिकृत परवानगी दिलेली नाही. दरम्यान, पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी आयसीसीला पत्र लिहून सामना धरमशाला येथून इतरत्र हलविण्याची विनंती केली आहे.