शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पद्मिनीची विजयी आगेकूच

By admin | Updated: October 8, 2014 03:18 IST

बुद्धिबळ आॅलिम्पियाडमधील सुवर्णपदकविजेती भारताची पद्मिनी राऊत हिने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला

अमोल मचाले, पुणेबुद्धिबळ आॅलिम्पियाडमधील सुवर्णपदकविजेती भारताची पद्मिनी राऊत हिने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या फेरीत विजयी प्रारंभ करणाऱ्या पद्मिनीने आज दुसऱ्या फेरीत क्रोएशियाच्या इवेकोविक तिहानावर मात करून आगेकूच केली. खुल्या गटातील भारतातर्फे विजेतेपदाचा दावेदार विदित गुजराथी यानेही सलग दुसरा विजय मिळवला. कालच्या पराभवातून सावरत पुण्याच्या आकांक्षा हगवणे हिने आज विजय नोंदवला. दोन्ही गटातील अव्वल मानांकित खेळाडूंना मात्र आज बरोबरीवर समाधान मानावे लागले. अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये तिसरे मानांकन असलेल्या वूमन ग्रॅण्डमास्टर पद्मिनीने ४३ चालींच्या लढतीत तिहानाचा पराभव केला. आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढती जिंकणाऱ्या ओडिशाच्या पद्मिनीने दुसऱ्या फेरीअखेर २ गुणांची कमाई केली आहे. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी प्रारंभ करणाऱ्या पद्मिनीने राजासमोरील प्यादे हलवून सिसीलियन डिफेन्स पद्धतीने पहिली चाल खेळली. त्याला तिहानाने सिसीलियन पॉल्सन पद्धतीने योग्य उत्तर दिले. मात्र, नंतरच्या चालींमध्ये तिहानाला योग्य पद्धतीने बचाव करता आला नाही. ही संधी पद्मिनीने साधली. २३व्या चालीत तिने घोड्याचे बलिदान दिले आणि २४व्या चालीत हत्तीदेखील देऊ केला होता. मात्र, हत्ती देण्याची तिची ही चाल फसवी होती. तिहानाने हत्ती मारला असता तर पद्मिनीने तिला चेकमेट केले असते. हे लक्षात आल्यावर तिहानाने हत्ती मारण्याचा मोह टाळला. २८व्या चालीत एक्सचेंजमध्ये तिहानाचा हत्ती गेला. पद्मिनीने ४३वी चाल खेळल्यानंतर तिहानाचे प्यादे जाणार होते. यानंतर पद्मिनीकडे २ हत्ती व १ प्यादे शिल्लक होते. दुसरीकडे तिहानाकडे १ हत्ती आणि १ घोडा होता. ही स्थिती पाहून तिहानाने पराभव मान्य केला.खुल्या गटात अव्वल मानांकित रशियाच्या व्लादिमीर फेडोसीव याला रोमानियाच्या डियाक बॉगडन डॅनिअल याने बरोबरीत रोखण्याची किमया साधली. दुसरे मानांकन असलेला नेदरलॅण्ड्सचा ग्रॅण्डमास्टर रॉबीन वॅन कॅ म्पेन याही आज बरोबरीवर समाधान मानावे लागले. चीनचा इंटरनॅशनल मास्टर जीन शी बाई याने २६ चालींअखेर त्याला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. मुलींच्या गटातील अव्वल मानांकित रशियाची अलेक्झांड्रा गोर्याचकिना सलग दुसरा विजय मिळवण्यात अपयशी ठरली.