शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्टन विराटसमोर जुनीच समस्या

By admin | Updated: January 12, 2015 01:41 IST

भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली

सिडनी : भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, धोनीच्या नेतृत्वाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आतूर असलेल्या नव्या कर्णधाराला अवघ्या दोन सामन्यांत धोनी आत्तापर्यंत झगडत असलेल्या समस्येची जाण झाली. नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, भारताकडे प्रभावी मारा करणारे गोलंदाज नसल्यामुळे हा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. कोहलीनेही मालिकेनंतर भारताला नव्या गोलंदाजांची आवश्यकता असल्याचे मान्य केले.कसोटी मालिकेतील भारताच्या पाच फलंदाजांच्या सरासरीचा विचार केल्यास तो आॅसीच्या फलंदाजांपेक्षा अधिक आहे. भारताच्या चार फलंदाजांनी एकतरी शतक ठोकले, तर आॅस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना ते करण्यात यश आले. विशेष म्हणजे यापूर्वी विराट वगळता भारतीय संघात अ‍ॅडिलेडमध्ये खेळण्याचा अनुभव कोणाकडेच नव्हता. याउलट आॅसी संघाच्या प्रत्येकाने फलंदाजी केली आहे. या सर्वाची तुलना केल्यास भारतीय फलंदाज यजमानांना पुरून उरले. मात्र, नाण्याची केवळ एकच बाजू भक्कम असून चालत नाही. चढ-उतारांच्या या मालिकेत फलंदाजांनी निर्णायक क्षणी स्वत:ला सिद्ध करून एक बाजू तारली, परंतु गोलंदाजांनी निराश केले. याउलट आॅसीच्या फलंदाजांच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाज लढले.