शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निहार म्हस्केची शानदार हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 14, 2016 03:34 IST

स्ट्राइकर निहार म्हस्के याने मोक्याच्या वेळी केलेल्या तीन गोलच्या जोरावर शेलार एफसी संघाने एकतर्फी विजय मिळवताना आय. सॉ. कोल्ट संघाचा ३-० असा फडशा पाडून बोरीवली

मुंबई : स्ट्राइकर निहार म्हस्के याने मोक्याच्या वेळी केलेल्या तीन गोलच्या जोरावर शेलार एफसी संघाने एकतर्फी विजय मिळवताना आय. सॉ. कोल्ट संघाचा ३-० असा फडशा पाडून बोरीवली प्रीमियर फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच रुथलेस एफसी संघानेही दणदणीत विजय सलामी देताना कॅस्टल बॉइज एफसी संघाला २-० असे नमवले.
बोरीवली स्पोटर््स फाउंडेशनच्या वतीने सेंट फ्रान्सीस डी’अ‍ॅसीस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेलार संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर आयसी संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला निहारने वेगवान गोल करत शेलार संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर २८ व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल करत संघाची आघाडी मजबूत केली. या वेळी आयसी संघाकडून जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा होती.
मात्र दडपणाखाली आल्यामुळे आयसी संघाकडून काही चुका झाल्या आणि त्याचा अचूक फायदा घेत पुन्हा एकदा निहारने गोल करून शानदार हॅट्ट्रिकसह संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली. या जोरावर मध्यांतराला शेलार संघाने एकहाती वर्चस्व राखले.
दुसऱ्या डावात आयसी संघाने पुनरागमनाचा काहीसा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. अखेर मजबूत बचावाच्या जोरावर आयसीच्या आक्रमकांना रोखताना शेलार संघाने सहज विजय मिळवला.
अन्य सामन्यात रुथलेस एफसी संघाने सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना कॅस्टल बॉइज संघाचे आव्हान २-० असे परतावले. कीगान परेरा याने नवव्याच मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेल्यानंतर डेन परेरा याने ३७व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी २-० अशी केली. ही आघाडी कायम राखत रुथलेसने बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)