शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडचे इंग्लंडला विक्रमी टार्गेट

By admin | Updated: June 2, 2015 01:04 IST

बी. जे. वॉटलिंगच्या शतकानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी

लीडस : बी. जे. वॉटलिंगच्या शतकानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ४५५ धावांचे विक्रमी लक्ष्य दिले आहे.न्यूझीलंडने आज ६ बाद ३३८ धावांवरुन पुढे खेळताना फक्त १६ षटकांत ११६ धावा करुन संघाची धावसंख्या ८ बाद ४५४ पर्यंत पोहचविली. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने आपला डाव घोषित केला. इंग्लंडला ४५५ धावांचे लक्ष्य देण्यात आले. पहिल्या डावात दोन्ही संघांनी ३५0 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोणालाच आघाडी मिळाली नव्हती.चौथ्या डावात कसोटी जिंकण्यासाठी सर्वाधिक ४१८ धावांचा पाठलाग वेस्ट इंडिजने यशस्वीपणे केला आहे. त्यांनी २00२-0३ मध्ये अँटिग्वा कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुध्द ही कामगिरी केली होती. इंग्लंडने ३३२ धावांचा यशस्वी पाठलाग १९२८-२९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुध्द केला होता. न्यूझीलंडच्या टार्गेटचा पाठलाग करताना उपहारापर्यंत इंग्लंडने बिनबाद ३२ धावा केल्या होत्या. अ‍ॅडम लिथ आणि कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक दोघेही १५-१५ धावा करुन खेळत होते.तत्पूर्वी, आज सकाळी वॉटलिंगने कालच्या नाबाद १00 धावांवरुन पुढे खेळताना २0 धावांची भर घातली. जेम्स अ‍ॅडरसनच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लीपमधील ज्यो रुटकडे झेल देवून तो बाद झाला. त्याने १६३ चेंडूच्या खेळीत १५ चौकार आणि एक षटकार मारला. यानंतर मार्क क्रेग (५८) आणि टीम साउथी (४0) यांनी केलेल्या टि-२0 स्टाईल फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला इंग्लंडवर मोठी आघाडी घेता आली.इंग्लंडकडून मार्क वूडने ३ तर अँडरसन आणि ब्रॉड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.(वृत्तसंस्था)