शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: June 3, 2015 00:33 IST

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडच्या आठ विकेटस मिळवून सामन्यावर फास आवळला आहे

लीडस : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडच्या आठ विकेटस मिळवून सामन्यावर फास आवळला आहे. सकाळी बिनबाद ४४ वरुन पुढे खेळताना इंग्लंडची धावसंख्या ८ बाद २0६ अशी संकटमय झाली होती.आज सकाळच्या सत्रात जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि स्पीनर मार्क क्रेग यांनी दोन दोन बळी मिळविले. पार्टटाईम स्पीनर केन विलियम्सनने उपहारापूर्वी बेन स्टोक्सला बाद केले.इंग्लंडने आज दिवसाच्या चौथ्याच षटकात सलामीवीर अ‍ॅडम लिथ (२४) याचा बळी गमावला. बोल्टच्या गोलंदाजीवर विकेटकिपर ल्यूक राँंचीने त्याचा झेल घेतला. डावखुरा जलदगती गोलंदाज बोल्टने यानंतर गॅरी बॅलेन्स (६) याचा त्रिफळा उडवून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. या धक्कयातून सावरण्याची संधी क्रेगने इंग्लंडला मिळू दिली नाही. त्याने केवळ तीन चेंडूत इयान बेल (१) आणि जो रुट (0) यांना तंबूत पाठवून इंग्लंडची नौका हादरवून सोडली. यावेळी इंग्लंडची अवस्था ४ बाद ६२ अशी झाली होती. बेन स्टोक्स याने दुसऱ्या बाजूला उभे असलेल्या कर्णधाराला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण विलियम्सनने आपल्या पाचव्या चेंडूवर त्याला बाद करुन ही भागीदारी संपुष्टात आणली. उपहारानंतरही यजमान संघाची गळती सुरुच राहीली. कामचलाउ फिरकी गोलंदाज म्हणून मॅक्युलमने विलियम्सनचा वापर केला परंतु तो न्यूझीलंडसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. (वृत्तसंस्था)