शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:29 IST

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली.

नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर मोदींनी फिट इंडिया मोहिमेचे महत्त्व समजावून सांगताना खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी असल्याचं सांगितलं. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी महान हॉकीपटू ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. त्यांनी तंदुरुस्तीचं महत्व सांगताना तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कसे कमी झाले, यावरही प्रकाश टाकला. या मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.  ते म्हणाले,'' मागील पाच वर्षांत क्रीडा क्षेत्रात सुधारणेसाठी प्रयत्न झाले. त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज विविध खेळात भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. त्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छितो. बॅडमिंटन, टेनिस, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती आदी खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी अपेक्षा उंचावल्या आहेत.  त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक पदकातून त्यांचे परिश्रम आणि त्याग दिसून येतो. हा नव्या भारताचा जोश आहे.'' खेळाचं थेट नातं तंदुरूस्तीशी आहे आणि त्यामुळेच फिट इंडिया मोहिम प्रारंभ करत आहे. पण, काळानुसार बरेच काही बदलले असल्याचे सांगत मोदींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,'' निरोगी होणं मोठ भाग्य आहे, व्यायामामुळे निरोगी राहता येतं. चांगल्या स्वास्थामुळे चांगली कार्य सिद्धीस नेता येतात. पण, आता काळ बदलला आहे. एक उदाहरण देतो, काही दशकांपूर्वी सामान्य व्यक्ती दिवसात 8-10 किलोमीटर सहज चालायचा. पण, हळुहळू तंत्रज्ञान आले, आधुनिक साधन आले आणि लोकांचं चालणं कमी झालं. आता परिस्थिती अशी आहे की, तंत्रज्ञामुळे आपले चालणे कमी झाले आणि तेच तंत्रज्ञान आपण किती चालावे हे आपल्याला सांगत आहे.   

टॅग्स :National Sports Dayराष्ट्रीय क्रीडा दिवसNarendra Modiनरेंद्र मोदी