शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नदाल, जोकोवीच, सेरेना तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: May 29, 2015 01:41 IST

अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चेक रिपब्लिकन्सची पेट्रा क्विटोवा यांनी अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटाची तिसरी फेरी गाठली.

पॅरिस : अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चेक रिपब्लिकन्सची पेट्रा क्विटोवा यांनी अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटाची तिसरी फेरी गाठली. मात्र यासाठी त्यांना तीन सेटपर्यंत चांगलेच झुंजावे लागले. त्याचवेळी पुरुष गटात मात्र सहाव्या मानांकीत क्ले कोर्टचा बादशाह स्पेनच्या राफेल नदाल, नोवाक जोकोवीचने आपल्या लौकिकानुसार दिमाखात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.सेरेनाने चांगली सुरुवात केल्यानंतरही तीला जर्मनीच्या अ‍ॅना-लेना फ्रेडसम विरुध्द पहिला सेट ५-७ असा गमवावा लागला. यानंतर मात्र तीने आपला हिसका दाखवत अ‍ॅनाला कोणतीही संधी न देता सलग दोन सेट जिंकले व ५-७, ६-३, ६-३ असा झुंजार विजय मिळवला. दुसऱ्या बाजूला चौथ्या मानांकित पेट्राला देखील झुंजावे लागले. स्पेनच्या सिल्वीया सोलर-स्पिनोसा विरुध्द पहिला सेट टायब्रेकमध्ये ६-७(४-७) असा गमावल्यानंतर पेट्राने जबरदस्त पुनरागमन करताना सिल्वियाचा ६-७(४-७), ६-४, ६-२ असा धुव्वा उडवला.त्यामानाने पुरुष गटात बलाढ्य नदालने सहज आगेकूच केली. एकतर्फी झालेल्या सामन्यात नदालने आक्रमक खेळाच्या जोरावर आपल्याच देशाच्या निकोलस अलमाग्रोचा ६-४, ६-३, ६-१ असा फडशा पाडला. पुरूष एकेरीत अव्वल मानांकीत नोवाक जोकोवीचने लॅक्समबर्गच्या जाईल्स मुलेर ६-१, ६-४, ६-४ असे नमवित यावर्षाचा सलग २४ वा विजय नोंदविला. दुसऱ्या एका पुरूषांच्या एकेरी लढतीत ब्रिटनच्या अँडी मुरेने पोर्तुगालच्या जोओ सोउसाचा ६-२, ४-६, ६-४, ६-१ असा पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.