मुंबई : कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या २८व्या वाको इंडिया प्रशिक्षणार्थी व वरिष्ठ राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या शितो रियू स्पोटर््स कराटे - किक बॉक्सिंग संघाच्या एस्थर परमसीवनने सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. त्याचवेळी राहुल साळुंखेनेदेखील रौप्य व कांस्यपदक पटकावत आपली चमक दाखवली. विविध वजनी गटांमध्ये या संघाच्या श्राव्या शेट्टी, आर्या गुलदेकर यांनी रौप्य तर मेघा देशमुख, मानसी गायकवाड, रोहिणी देशमुख आणि प्रियंका पटेल यांनी कांस्यपदक जिंकले. उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या या संघाने एक सुवर्णपदकासह एकूण १० पदकांची लयलूट करताना स्पर्धेत आपली छाप पाडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}