शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या मुलींचे ‘सुवर्ण’

By admin | Updated: October 31, 2016 04:19 IST

महाराष्ट्र राज्यस्तरीय टग आॅफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेत १३ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत अनुक्रमे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर संघाने विजेतेपद मिळवले.

मुंबई : महाराष्ट्र राज्यस्तरीय टग आॅफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेत १३ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत अनुक्रमे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर संघाने विजेतेपद मिळवले. ‘जोर लगाके...’असे संपूर्ण स्पर्धेत मुंबईच्या मुलींचे वर्चस्व दिसून आले. स्पर्धेत राज्यातून ३५ संघांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र टग आॅफ वॉर संघटना आणि मुंबई टग आॅफ वॉर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चेंबूर येथील गांधी मैदानात रंगलेल्या स्पर्धेत मुंबई उपनगरसह मुंबई शहर, पुणे,अहमदनगर, कोल्हपूर अशा सर्व मुलींच्या जिल्हा संघाने हजेरी लावली. स्पर्धेपूर्वी सर्व संघाच्या खेळाडंूनी दिमाखात पदसंचलन केले. स्पर्धेत १३ वर्षांखालील वयोगटासाठी ३४० किलोग्रॅम, १५ वर्षांखालील गटासाठी ३६० किलो, १७ वर्षांखालील गटासाठी ४०० व ४२० किलो आणि १९ वर्षांखालील गटासाठी ४४० व ४६० किलो अशी वजनमर्यादा निश्चित करण्यात आली होती. स्पर्धेच्या ३४० किलो आणि ४६० किलो वजनी गटात अनुक्रमे मुंबई उपनगर आणि मुंबई संघाने नागपूर संघाला धुळ चारत सुवर्ण पदाकाला गवसणी घातली. तर दोन्ही गटात नागपूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ४४० किलो वजनी गटात मुंबईकरांनी पुणे करांना नमवत सुवर्ण कमाई केली. ३४० किलो गटात सोलापूर संघाने कांस्यपदकावर नाव कोरले. तर पुणे संघाने ४६० किलो वजनी गटात कांस्यपदकावर झेप घेतली. स्पर्धेच्या ३६० किलो वजनी गटात मुंबई उपनगरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर सोलापूर संघाने अव्वल स्थान पटकावले असून दुसऱ्या स्थानी लातूर संघाने झेप घेतली. तर ४०० किलो वजनी गटात मुंबईकरांनी रौप्य पदक पटकावले असून या गटात नागपूरकरांनी बाजी मारली. ४२० किलो वजनी गटात सोलापूर संघाने विजेतेपद मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)